एका तरुणाने मोलकरणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे आई, वडील, बहीण आणि पत्नी अशा चौघांची हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रयागराज येथील धुमनगंज परिसरात ही हत्या झाली. हत्या झालेल्या कुटुंबाचं नाव केसरवानी आहे. आतिश हा विवाहित असूनही त्याचे मोलकरणीशी विवाहबाह्य संबंध होते.
या प्रकरणामुळे त्याचे कुटुंबाशी वादही होत होते. काही दिवसांपूर्वी त्याची बहीण निहारिका हिने त्याचा मोलकरणीसोबतचा फोटो व्हायरलही केला होता.
यामुळे संतापलेल्या आतिशने मित्राला प्रत्येकाचे दोन लाख या हिशोबाने 8 लाखांची सुपारी दिली. त्याचे 75 हजार रुपये आगाऊही दिले. त्यानुसार मित्राने काही साथीदारांच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणलं.
पोलिसांनी या प्रकरणातील बहुतांश आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना आतिशवर संशय आला.
हत्येसाठी वापरलेला चाकू आणि नंतर बेसिन आणि सांडपाण्याच्या पाईपमध्ये मिळालेले रक्ताचे नमुने यांवरून हत्या ओळखीच्या व्यक्तिनेच केली असावी,
असा पोलिसांचा कयास होता. त्यांनी आतिशची कसून चौकशी केली, तेव्हा त्यानेच या हत्येचं कारस्थान रचल्याचं कबूल केलं.