अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- कोंबडीला मारलेल्या दगडाने कोंबडी मरण पावल्याने याबाबत विचारणा करण्यास गेल्याने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु येथे घडली आहे. या बाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु येथील राणी कांबळे
यांच्या कोंबडीला दगड मारल्याने कोंबडी मरण पावल्याने राजेंद्र महादेव हराळ व छाया अनिल हराळ दोघे (रा.निमगाव खलु) यांना विचारपुस करण्याकरिता गेले असता ता दोघांनी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करत
तुम्ही गावात कसे राहता तेच बघते असे म्हणुन फिर्यादीस खाली पाडुन लाथाबुक्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.