अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- कर्जत तालुक्यातील चिलवडी गावात एकाच्या राहत्या घरात शिरून चोरटयांनी चोरी केली होती. दरम्यान या प्रकरणातील दोन चोरट्यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघा चोरट्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
तालुक्यातील चिलवडी गावामध्ये कोंडाबाई चव्हाण यांच्या घरातून अज्ञात चोरांनी गळ्यातील अर्धा तळायचे मनी मंगळसूत्र चोरून नेले आहे.
याबाबतची माहिती पीडितने सांगताच गावातील नागरिक तात्काळ संबंधित ठिकाणी गोळा झाले. तसेच पोलीस पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.
चव्हाण यांनी चोरटे पाहिले असल्याने गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला असता त्यातील निखिल सचिन भोसले व .सलमान राजेंद्र भोसले (दोघे राहणार चिलवडी, ता. कर्जत) यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनला कोंडाबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.