अहमदनगर क्राईम

तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या त्या खोट्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी व्हावी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- एका राजकीय महिला पदाधिकारी मार्फत तोफखाना पोलीस स्टेशनला खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोप करुन, या प्रकरणी चौकशी करुन खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, नेवासा तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे, शुभम बडेकर उपस्थित होते. सावेडी येथील जागेच्या प्रकरणातून दि.14 ऑक्टोंबर रोजी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये एका राजकीय महिला पदाधिकारी मार्फत जय भिंगारदिवे नामक व्यक्तीने अ‍ॅड. प्रकाश सावंत यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.

राजकीय महिला पदाधिकारीचे सावंत यांनी भिंगारदिवे यांना शिवीगाळ केल्याचे म्हणने आहे. मात्र याचा राग भिंगारदिवे यांना न येता, त्या महिलेला आला. भिंगारदिवे याला पुढे करुन सदर महिलेने खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मागासवर्गीय समाजावर अहमदनगर जिल्ह्यात अन्याय, अत्याचार झाल्यास तातडीने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही.

यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांना अनेक आंदोलने करावी लागतात व मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र या जागेच्या दिवाणी वादात पोलीसांनी त्या राजकीय महिला पदाधिकारीच्या सांगण्यावरुन त्वरित गुन्हा दाखल केला.

पोलीस प्रशासन कोणत्या अमिषाला बळी पडले? हा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्ह्याची चौकशी करुन खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रश्‍नी न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office