Ahmednagar Crime : शहरातील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातील अन्यधर्मीय अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अनोळखी मैत्रिणीच्या मदतीने स्वतःच्या घरात बंधक बनवून ठेवल्याचा प्रकार दुपारी घडला असून,
याबाबत पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलगा आणि एक अज्ञात महिलाविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण विरुद्ध कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत सकाळी १० वाजता शाळेत गेली मात्र आजारी असल्याने ती ११ वाजता घरी निघाली.
पिडीत मुलीला शाळेबाहेर गाठून चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातील अल्पवयीन मुलाने दुसऱ्या एका अज्ञात आरोपी मुलीची मदत घेवून पिडीतेला स्वतःच्या घरी नेत बंधक बनवले व लग्न करण्याची अट घातली, अन्यथा पिडीतेच्या कुटुंबियांना त्रास देण्याची धमकी दिली. मात्र संधी मिळताच पिडीत मुलीने सहीसलामत या ठिकाणाहून पलायन करत घर गाठले. मात्र याबाबत पिडीत मुलीच्या नातेवाईकांना माहिती समजताच त्यांनी इतरांना याबबत कल्पना दिली.
त्यामुळे सायंकाळी पोलीस ठाण्यात नागरिकांचा मोठा जमाव झाला होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी जमावाला व पिडीतेच्या नातेवाईकांना संबंधित आरोपीवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. पाथर्डी शहरातील विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यानेचे वर्गातील विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून बंधक बनवून लग्न करण्याची गळ घातली या सर्व गैरप्रकारात एका अनोळखी सज्ञान मुलीचा समावेश असल्याचा प्रकार पिडीत मुलीने तिच्या नातेवाईकांना व पोलिसांना सांगितले.
पोलीस तपासात उघड होईल. मात्र पाथर्डी शहरातील शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेला भर रस्त्यात विद्यार्थीनींची छेड काढली जात आहे. सायंकाळी बाजारपेठ मंदिरे आदी ठिकाणी बसून आंबटशौकीन हे महिला व मुलींची खुलेआम छेड काढत आहेत.
याकडे पोलिसांनी वेळीच लक्ष देणे आवश्यक झाले आहे. अन्यथा अशा प्रकरणावरून आणखी जातीय तणाव निर्माण होवू शकतो. अल्पवयीन पिडीतेला चाकूचा धाक दाखवून लग्नाची गळ घालणारा देखील अल्पवयीन मुलगा आहे. मात्र त्यांना चाकू उपलब्ध करून देणारे, मदत करणारी दुसरी सज्ञान मुलगी कोण ? संबधित शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन यांची विद्यार्थिनीच्या सुरक्षीततेची जबाबदारी काय ? पोलीस अश्या घटना वारंवार घडूनही शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त का घालत नाहीत ?
विना क्रमांकाच्या दुचाकीवरून चोऱ्या, महिला व मुलींची खुलेआम छेडछाड होत असताना पोलीस अशा वाहनांवर काहीच कार्यवाही का करत नाहीत? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र दोन धर्मातील सलोखा व अल्पवयीन मुलींचे दहशतमुक्त वातावरणात शिक्षण सुरु राहण्यासाठी सर्वच जाती धर्मातील पाथर्डीकरांनी वेळीच जागरूक होणे आवश्यक झाले आहे.
अन्यथा अश्या आंबट शौकीन गिधाडांच्या भीतीने अनेक मुलींची शिक्षणाचे दारे बंद होवू शकतात! या प्रकरणाचा निषेध म्हणून आज मंगळवारी पाथर्डी शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी शहरातील नागरिकांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन हिंदू रक्षा समितीच्यावतीने सर्वांना करण्यात आले आहे.