Ahmednagar News : हद्द झाली ! आता तर नगर शहरात गावठी कट्टे आणले विक्रीला

Published by
Ahmednagarlive24 Office

नगर शहरात विविध गुन्हे उघडकीस येत आहेत. आता तर शहरात कट्टे विक्रीस आणण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. उपनगरीय भागातील गंगा उद्यान परिसरात गावठी कट्टे विक्रीस आणलेल्या एकास जेरबंद करण्यात आले आहे.

त्याच्याकडून दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. करण कृष्णा फसले (वय ३० वर्षे, रा. ख्रिस्त गल्ली, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी उशीरा तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील गंगा उद्यानाच्या भिंतीलगत एक इसम गावठी कट्टे घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोनि आनंद कोकरे यांना मिळाली. त्यांनी तपास पथकाचे पोसई सचिन रणशेवरे व अंमलदारांना बोलावून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस पथकाने गंगा उद्यान भागात सापळा रचून करण फसले यास अटक केली. त्याच्या कब्जातून ४० हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे हस्तगत केले आहेत. याबाबत पोहेकॉ भानुदास खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई सचिन रणशेवरे हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आनंद कोकरे, पोसई सचिन रणशेबरे, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेका भानुदास खेडकर, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनील शिरसाट, पोहेकों अहमद इनामदार, पोहेकॉ सुधीर खाडे, पोना वसीम पठाण, पोना संदिप धामणे, पोकॉ सुमीत गवळी, पो.कॉ. शिरीष तरटे, पोकॉ दत्तात्रय कोतकर, पोकॉ सतीश भवर, पोकों सतीश त्रिभुवन, पोकॉ बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office