अहमदनगर क्राईम

सोन्याच्या दुप्पट पैशाचे आमीष पडले महागात..? दुप्पट मिळाले पण पैसे नव्हे तर..?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : म्हणतात ना पैशासाठी माणूस करेल ते सांगता येत नाही.अगदी अशीच काहीशी घटना घडली आहे. सोन्याच्या दागिन्याचे दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका महिलेकडील अडीच तोळ्यांचे दागिने घेऊन तिला दुप्पट पैशाऐवजी रुमालात बांधून दगडे बांधून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी संगीता रमेश चवालिया या त्यांच्या नातीसह बाजारपेठेत गेल्या होत्या. डाळमंडई येथे त्यांना दोन युवक भेटले. त्यांनी त्यांच्याकडील बॅगमध्ये दोन लाख रुपये असल्याचे संगीता यांना सांगत पैसेही दाखविले.

त्यातील एक जण संगीता यांना म्हणाला,‘तुमच्या जवळ किती सोने आहे ते मला काढून द्या, मी तुम्हाला त्याचे दुप्पट भावाने पैसे देतो’, असे म्हटल्याने संगीता यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. यानंतर संगीता यांनी त्यांच्याकडील दीड तोळ्याचे मिनी गंठण व एक तोळ्याचे कानातील वेल, झुमके काढून दिले.

संगीता यांनी चोरट्यांकडे अडीच तोळ्याचे दागिने दिल्यानंतर त्यांनी संगीता यांच्या हातात गाठोडे बांधलेला रुमाल दिला. सदरचा रुमाल घरी जाऊन सोडण्याचा सल्लाही दिला. संगीता यांनी रुमाल घरी आल्यावर सोडून पाहिला असता त्यामध्ये दगडे मिळून आली. यानंतर संगीता पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office