१० फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : चासनळी परिसरात २० डिसेंबर रोजी गोदावरी नदीपात्रात पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता.शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या चिमुकल्याचा खून झाल्याचे उघड झाले.प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत असल्याने आई आणि तिच्या प्रियकराने मिळून मुलाचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.तालुका पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ यांनी अनैतिक संबंधात आड येत असल्याने कार्तिकचा निर्दयपणे काटा काढण्याचा कट रचला.२० डिसेंबर रोजी या दोघांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यांत गुंडाळून, हातपाय बांधून चासनळी येथे गोदावरी नदीपात्रात फेकून दिले.

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कसून चौकशी केली असता, हा खून अनैतिक संबंधांमुळे झाल्याचे निष्पन्न झाले.संशयित आरोपींना शोधून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.