येथे पोलीस कर्मचार्‍याचे आई-वडिलही सुरक्षित नाही; झाली मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- नागरदेवळे (ता. नगर) येथील शेलार मळ्यात राहणारे देविदास शेलार, सुमन देविदास शेलार यांना मारहाण करण्यात आली. मारहाण झालेले पती-पत्नी पोलीस कर्मचार्‍याचे आई-वडिल आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी मारहाण करणारा निखिल धोंडीराम शेलार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुमन शेलार यांनी फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी धोंडीराम शेलार याने सुमन शेलार यांना शिवीगाळ केली होती.

याप्रकरणी धोंडीराम शेलार विरोधात अदलखपात्र गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यावरून पोलिसांनी योग्य वेळी संबंधित व्यक्तीला समज दिली असती तर हा प्रकार घडला नसता, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

Advertisement

वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याच्या मनात राग धरून सुमन शेलार व देविदास शेलार यांना आरोपी निखिल धोंडीराम शेलार याने घरात घुसून जबर मारहाण केली.

सदर गुन्हा दाखल केल्यानंतर हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असतानादेखील आरोपी निखील शेलार याला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणेला चार दिवस लागले.

या आरोपीस काही ठराविक पोलीस मदत करत असल्याचा आरोप सुमन शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पोलिसांनी कर्मचार्‍यांच्या आई-वडिलांसोबत अशा घटना घडत असतील आणि पोलीस या पद्धतीने कारवाई करत असतील तर सर्वसामान्य नागरिक पोलीस न्याय कसा देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement