अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime News: दोन मित्रांचा खून करून पळाला पोलिसांनी अहदनगरजवळ पकडला !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime News : सातारा जिल्ह्यातील दोन इसमांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून धबधब्याच्या दरीत ढकलून देऊन त्यांचा खून करून पसार झालेला आरोपी पोलिसांनी जेरबंद केला आहे. याबाबद पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 

दि. १६ जुलै २०२३ रोजी दुपारी ४.२५ वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जावळी तालुक्यातील एकीव गावातील धबधब्याजवळ अनोळखी दोन इसमांनी अक्षय शामराव अंबवले (रा. बसाप्पाची वाडी),

गणेश अंकुश फडतरे (रा. करंज, ता. जि. सातारा) या दोन्ही इसमांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन धबधब्याच्या दरीत ढकलून देवून त्यांचा खुन केला म्हणून मेढा येथे गु. र.नं ११४ / २०२३ नुसार भा.दं.वि. कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील आरोपी साहील मेहबुब शेख (रा. भिमाबाई आंबेडकरनगर, सदर बाजार, सातारा) हा मालवाहतुक ट्रकमध्ये बसुन सातऱ्याकडुन जालन्याकडे जात आहे, अशी माहिती सातारा पोलीसांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांना माहिती दिली.

त्यावरुन पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी सविता उंदरे, शाम गुंजाळ, सुमित करंजकर व किरण गायकवाड यांचे पथक तयार करून त्यांना खडका फाटा येथे रवाना केले. पथकाने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यादरम्यान ट्रकमध्ये हा आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास नेवासा पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यास पोलीस स्टेशन नेवासा येथे आणुन कायदेशीर कारवाई पूर्ण करुन सातरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

Ahmednagarlive24 Office