अहमदनगर क्राईम

जमिनीच्या वादातून भावनेचं केला भावावर कोयत्याने वार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेती ब घराच्या वाटणीवरून लहान भावाने मोठ्या भावावर कोयत्याने वार केल्याची घटना राहुरी तालुक्‍यातील गणेगाव येथे दिनांक १७ मार्च रोजी घडली. या घटनेत जखमी झालेल्या मोठ्या भावावर श्रीरामपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रशांत गुलाब कोबरणे (वय ३० वर्षे, राहणार गणेगाव, ता. राहुरी) हे आई ब लहान भाऊ प्रमोद सर्व सुमारे १० वर्षांपासून श्रीरामपूर येथे राहतात. प्रशांत कोबरणे व प्रमोद कोबरणे यांच्यात शेतीच्या व घराच्या वाटाघाटीच्या कारणावरुण नेहमी वाद होत असतात.

दिनांक १७ मार्च रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास प्रशांत कोबरणे हे घरासमोर उभे असताना त्या ठिकाणी त्यांचा भाऊ प्रमोद कोबरणे आला आणि तो प्रशांत कोबरणे व त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून म्हणाला की, तु मला माझी शेती ब घराची वाटणी का देत नाही, तेव्हा _ कोबरणे त्याला म्हणाले की, तु आम्हाला शिविगाळ करु नकोस.

आपण गावातील चार प्रतिष्ठीत नागरीक बसवून आपली बैठक घेऊ व वाटणी करू. असे म्हणाल्याचा राग आल्याने प्रमोद याने घरासमोर पडलेला कोयता उचलून प्रशांत कोबरणे यांच्यावर घरात घुसून त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

तेव्हा प्रशांत कोबरणे रक्‍तभंबाळ होऊन जागेवरच बेशुद्ध पडले. तेव्हा त्यांना प्रशांत दिलीप कोबरणे व ज्ञानेश्‍वर राजेंद्र कोबरणे यांनी त्यांच्या खासगी वाहनाने औषध उपचारासाठी श्रीरामपूर येथील रूग्णालयात दाखल केले.

प्रशांत यांनी शुद्धीवर आल्यानंतर जबाब नोंदवला. त्यानुसार आरोपी प्रमोद गुलाब कोबरणे (वय २५ वर्षे, राहणार दत्तनगर, ता. श्रीरामपुर, हल्ली राहणार गणेगाव, ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ३१७/२०२३ नुसार भा.द.वि. कलम ३३४, ४५२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office