अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात औद्यागिक वसाहत परिसरातील एका शोरूममधून चोरटयांनी ९ वाहनांच्या बॅटऱ्यां लंपास केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, औद्योगिक वसाहतीमधील टाटा मोटर्सच्या लीना इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे ही चोरीची घटना घडली आहे.
हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी बुधवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नाशिक पुणे महामार्गावर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात टाटा मोटर्सचे अधिकृत शोरूम आहे.
९ वाहनांच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.