अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालूक्यातील मुळा धरण परिसरातील एका ३६ वर्षीय महिलेला बंदूकीचा धाक दाखवून तिचे अपहरण करून तू माझ्याशी शारीरीक संबंध ठेव. मला टाळू नकोस. मी सांगेल तेव्हा मला बाहेर भेट.
नाहीतर मला पाच लाख रूपये दे. तरच तूझा विषय सोडून देईल. असे म्हणत त्या महिलेचा विनयभंग करून तिच्याकडून तीन लाख रूपये खंडणी वसूल केल्याप्रकरणी शुक्रवार दि 1 ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरातील एक ३६ वर्षीय विवाहित महिला एक कार्यक्रम आवरून घरी जात होती.
यावेळ सुनिल लक्ष्मण लोखंडे (राहणार शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी पुणे) याने राहुरी परिसरात त्या महिलेच्या गाडीला अचानक गाडी आडवी घातली. त्यावेळी आरोपी सुनील लोखंडे याने त्या महिलेला बंदूकीचा धाक दाखवून जबरदस्तीने स्वतःच्या गाडीत बसवीले.
आणि तिचे अपहरण केले. तू माझ्याशी बोलत नाहीस. मला का टाळतेस. मला निवांत भेटायला बाहेर का येत नाही. अशी विचारणा केली. तू माझ्या संपर्कात राहून माझ्याशी शारीरीक संबंध ठेव. मला टाळू नकोस. मी सांगेल तेव्हा मला बाहेर भेट. नाहीतर मला पाच लाख रूपये दे. तरच तूझा विषय सोडून देईल.
माझे ऐकले नाहीतर मी तूझी सोशल मीडियावर इज्जत घालून व बदनामी करून तूझे समाज कारण व राजकारण संपवून टाकीन. तू जर माझ्या विरोधात पोलिसात गेली तर तूला व तूझ्या कुटुंबाला संपवून टाकीन. अशी धमकी देऊन त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे अश्चील वर्तन करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच तिच्याकडून सुनील लोखंडे याने तीन लाख रूपयांची खंडणी बळजबरीने वसूल केली. महिलेने श्रीरामपूर येथील पोलिस ठाण्यात आरोपी सुनील लक्ष्मण लोखंडे याच्या विरोधात आर्म ॲक्ट, अपहरण, विनयभंग तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केलाय. तो गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आहे