अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने आडात उडी घेतल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथे घडली आहे.(husband’s persecution)
यामध्ये विवाहित महिला उषा बापू कळसाईत ( वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. या घेतनी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत विलास रामचंद्र कावरे रा. धानोरा ता. जामखेड यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथील बापू बबन कळसाईत यांच्यासोबत त्यांची मुलगी उषा तिचा विवाह झाला.
मात्र विवाहानंतर तिचा पती बापू कळसाईत हा सातत्याने दारू पिऊन मारहाण करीत असे तसेच शारीरिक व मानसिक त्रास देत होता.
अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून तिने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी बापू कळसाईत याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.