अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पाकिस्तानने हे कठोर पाऊल उचलले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने एक नवा कायदा संमत केला आहे.
या कायद्यानुसार बलात्कारी व्यक्तीला नपुंसक बनवले जाणार आहे, अशी कायद्यात तरतूद देखील आहे. दरम्यान महिला अत्याचार, बलात्कार हा जगभरातील चिंतेचा विषय आहे.
यावर आळा घालण्यासाठी अनेक देशांमध्ये कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांसाठी जन्मठेपेपासून फाशीपर्यंतच्या शिक्षेची कायद्यात तरतूद असते.
बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पाकिस्तानने हे कठोर पाऊल उचलले आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या कायद्यावर सही करुन कायदा संमत केला.
बलात्काराच्या घटनांमध्ये प्रकरण अनेक वर्षे न्यायालयात प्रविष्ठ राहते. अशावेळी पिडितेला न्याय मिळण्यास उशीर होतो. हे पाहता या कायद्यात गुन्हेगाराची लवकर सुनावणी आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
बलात्कारामध्ये दोषी आढळलेल्यास केमिकल किंवा औषधांच्या सहाय्याने नपुसंक बनवले जाऊ शकते असं माहिती समोर येतेय.