अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- तरूणाने युवतीवर दोन वेळा अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. अत्याचारानंतर युवतीची बदनामी केल्याचेही समोर आले आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणारा तरूण सुरज सुरेश नन्नवरे (रा. केतकी ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्या युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. सुरूवातीला फिर्यादी व सुरज नन्नवरे यांची मैत्री झाली.
22 फेब्रुवारी रोजी सुरजचा वाढदिवस असल्याने फिर्यादी व सुरज त्याच्या बोल्हेगाव येथील मित्राच्या घरी गेले होते. तेथे वाढदिवस साजरा झाल्यानंतर त्याने फिर्यादीला वरच्या मजल्यावर नेऊन बळजबरी करून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,
असे म्हणत तिला धमकी देऊन अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा बंधन लॉनजवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये पीडितेला घेऊन जात पुन्हा अत्याचार केला.
त्यानंतर पीडितेच्या मैत्रीणीला मोबाईलवर मेसेज पाठवून दोघांच्या संबंधाची माहिती देत बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.