अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : टेम्पो चालकाला लुटत फरार झालेल्या दोघांना २४ तासांच्या आत अटक !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : टिळक रस्त्यावर टेम्पो चालकाला अडवून ३० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले. कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावून नगर-सोलापुर रोडवरील कोंबडीवाला मळा येथून अटक केली असून,

दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेश गुलाब बडदे (वय २५, रा. इंगळेमळा सारसनगर, अहमदनगर) सुमेध किशोर साळवे (वय २५, रा. गौतमनगर, बालिकाश्रम रोड, अहमदनगर) अशी दोघा आरोपींची नावे आहे.

फिर्यादी स्वप्नील रावसाहेब गंगावणे (वय १८, रा. कवडाणे, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हे शुक्रवारी (दि.४) पहाटे १ वा. टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालयसमोरुन त्यांच्या टेम्पो घेऊन जात असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून गाडी फोडून ३० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली होती.

याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली होती की, या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी नगर-सोलापूर रस्त्यावर एका ठिकाणी थांबलेले आहेत. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office