Ahmednagar Crime : शेतात आलेले दगड रस्त्याच्या कडेला लावण्याच्या कारणावरुन सात जणांनी मिळुन दोघांना कुन्हाड व लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केल्याची घटना तालुक्यातील बारागाव नांदुर येथे नुकतीच घडली. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण जगन्नाथ गाडे (वय ४१) हे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे राहत आहेत. त्यांच्या शेताजवळच राहुरी गावाच्या शिवारात कैलास नवनाथ गाडे हे त्याच्या कटंबासह राहवयास आहे. (दि. २८) ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान लक्ष्मण गाडे व त्यांचा मुलगा हे त्यांच्या शेतात आलेले दगड रस्त्याला लावत होते.
त्यावेळी आरोपी तेथे आले. आणि म्हणाले की, तुम्ही रस्त्याला दगड का लावत आहेत. तेव्हा लक्ष्मण गाडे त्यांना म्हणाले की, दगड हे आमचे शेतात आले आहेत. ते फक्त रस्त्याच्या कडेने लावत आहोत.
असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी घाणघाण शिवीगाळ केली तसेच कुऱ्हाड, लोखंडी गज व लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर तुम्ही आमच्या नादी लाग नका. नाहीतर तुमचा काटाच काढतो. अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेत लक्ष्मण गाडे यांचा मुलगा सात्विक व भाऊ मिनिनाथ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. लक्ष्मण जगन्नाथ गाडे यांच्या फिर्यादीवरून विलास नवनाथ गाडे, कैलास नवनाथ गाडे,
नवनाथ काशिनाथ गाडे, संतोष रावसाहेब गाडे, रविंद्र बाळासाहेब गाडे, नानासाहेब काशिनाथ गाडे, सतिश नानासाहेब गाडे (सर्व रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी) यांच्यावर जबर मारहाण करुन धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.