२ जानेवारी २०२५ तांदुळवाडी : बालविवाह करून पीडित अल्पवयीन मुलीस गरोदर करून नवजात बालकास जन्म दिल्याने राहुरी पोलिसांनी नुकतीच आरोपीस अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी व त्याचे आई-वडील व सासू-सासरे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लग्न लावून दिले. तसेच सदर आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीशी जबरीने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर ठेवले व नवजात बालकास जन्म दिल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात मुख्य आरोपीस राहुरी पोलिसांनी नुकतीच अटक केली असून त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहे.
त्यामुळे कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये,अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो.सर्व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे, गोवर्धन कदम, अंकुश भोसले, इफ्तेखर सय्यद, सचिन ताजने यांच्या पथकाने केलेली आहे.