Ahmednagar Crime News : कपडे शोधायला गेली, सापडले पतीच्या घटस्फोटाचे पेपर ! लग्नानंतर १५ दिवस…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime News : व्यवसाय करण्यासाठी पैसे आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह, सासू, सासरे आणि नणंद अशा पाच जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित रवींद्र बडवे, कल्पना रवींद्र बडवे, रवींद्र चिंतामण बडवे (सर्व राहणार धर्माधिकारी मळा, बालिकाश्रम रोड), प्राची योगेश भापकर (रा. कर्जत) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत आरती रोहित बडे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे २०२० मध्ये लग्न झाले. लग्नापासून पुढील १५ दिवस त्यांना सासरच्यांनी चांगले नांदवले. त्यांनी पतीचे कपाट उघडून त्यात कपडे शोधत होत्या. त्यावेळी त्यांना पतीच्या घटस्फोटाचे पेपर सापडले.

याबाबत त्यांनी पतीकडे विचारणा केली, त्याचा राग आल्याने सासू व पतीने फिर्यादी महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडे संसारोपयोगी वस्तूंची सासऱ्यांनी मागणी केली. त्यामुळे विवाहितेच्या वडिलांनी २ लाख ५० रुपयांचे भांडे घेऊन दिले.

त्यानंतर पतीने फोन करून फिर्यादी महिलेच्या वडिलांकडे व्यवसायासाठी तीन लाखांची मागणी केली. त्यांनी येथील भरोसा सेलकडे अर्ज केला. तक्रार केल्यानंतर सासरचे भरोसा सेलमध्ये हजर झाले व त्यांनी फिर्यादी महिलेस नांदवण्यास नकार दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.