अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे हे माहित असताना देखील अनेक पालकांकडून आपल्या पाल्यांचा विवाह उरकण्याची घाई केली जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.
यातच गेल्या काही महिन्यांपासून या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे.
पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे एकाच दिवशी तीन बालविवाह होण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामसेवक भगवान भिवसेन खेडकर यांनी फिर्याद दिली असून पाथर्डी पोलीस ठाण्यात 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी ग्रामसेवक खेडकर यांना नगर येथील चाईल्डलाईन संस्थेतून फोन आला की, एकनाथवाडी येथे तीन बालविवाह होत आहेत.
या नंतर खेडकर यांनी एकनाथवाडी येथे जाऊन चौकशी केली असता त्यांना एकनाथवाडी गावात दोन तर एकनाथवाडीच्या बाहेर असलेल्या एका वस्तीवर एक असे तीन बालविवाह झाले असल्याचे समजले.
ज्या घरात हे विवाह झाले त्या घरातील नवरदेव व नवरीच्या कागदपत्रांची खेडकर यांनी तपासणी केली असता त्यांना या घटनेतील तिनही मुली अल्पवयीन असल्याचे आढळून आहे.
हे लग्न लावणार्या नवरदेवाचे आई- वडील, मामा- मामी, मंडपवाला व तीनही लग्नातील ब्राह्मण असे मिळून एकूण 33 जणांविरोधात खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अद्याप पर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही आहे.