अहमदनगर क्राईम

हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठ्यास अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :शेतजमिनीवर वारसा हक्काची नोंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठ्याला अटक करण्यात आली आहे.

पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील तलाठी लता एकनाथ निकाळजे यांना नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.पारनेर तालुक्यातील तिखोल येथील एका शेतकऱ्याने यासंबंधी तक्रार दिली.

तिखोल गावातील त्यांचे आजोबा व वडील यांचे नावावर असलेली शेतजमीन वारसा हक्काने तक्रारदार, त्यांची आजी, आई, भाऊ यांचे नावे करुन त्यांचे नावाची नोंद लावण्यासाठी अर्ज दिला होता. त्यानुसार नोंद लावण्यासाठी तलाठी लता एकनाथ निकाळजे यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदारांनी एक हजार रुपये दिले. मात्र, उरलेले एक हजार मिळाल्याशिवाय काम करण्यास निकाळजे यांनी नकार दिला. त्यामुळे तकारदारांनी नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सापला रचण्यात आला. त्यामध्ये निकाळजे यांना एक हजार रुपये घेताना पकडण्यात आले.

Ahmednagarlive24 Office