अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव परिसरातील नदीपात्रात एक मृतदेह आढळून आल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच आता नेवासा शहरातील गणपती घाट प्रवरा नदी पात्रात महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आला आहे.
नेवासा गणपती घाट प्रवरा नदी पात्रात काल सकाळी आशाबाई शिवाजी पाटील (वय ७०) वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांच्या लक्षात आले.
त्यांनी पोलिसांना सदर घटनेची तत्काळ माहिती दिली.यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश कचे व पोलीस कॉन्स्टेबल वैद्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मृतदेह पाण्याबाहेर काढत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेवासा फाटा येथे पाठवण्यात आला.