अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात एका विहिरीत एक ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात काल दुपारी घडली.
अनिता उत्तम गफले (वय ४०, रा. वेल्हाळे) असे या महिलेचे नाव आहे. तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. विहिरीत बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी गेले.
घटनेचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ते पुढील तपास करीत आहेत. दरम्यान तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.