अंकारा तुर्कीमध्ये एका माजी फुटबॉल खेळाडूनी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या त्याच्या 5 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सेव्हर टोकतास ( ३२ वर्ष) असे या खेळाडूचे नाव असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 4 मे रोजी सेव्हरनं त्याचा मुलगा कासिमचे तोंड उशीनं दाबून त्याची हत्या केली, अशी माहिती अनाडालु एजन्सीने दिली.
सुरुवातीला मुलाचा मृत्यू संशयास्पद मानला जात होता, त्यामुळं त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू गुदमरून झाल्याचं समोर आलं.
हबरटर्क टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, सेव्हर आपल्या मुलावर प्रेम करत नसल्यामुळं त्यानं त्याचे तोंड उशीनं दाबून त्याची हत्या केली.
त्यानंतर 11 दिवसांनी सेव्हरनं स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. सेव्हर टीम बर्सा येल्डिरीमस्पोरकडून फुटबॉल खेळत होता. सेव्हर टोकतासला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.