अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- सोमवारी कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून पकडलेल्या सहा जणांच्या टोळीकडून १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली, दीड हजार रुपयांचे तीन मोबाईल, असा मुद्देमाल जप्त केला.

या टोळीविरूद्ध पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रासह चार राज्यामध्ये विविध प्रकारचे दरोडा, जबरी चोरीचे एकूण २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती चौकशीमध्ये समोर आली आहे.

जिग्नेश दिनेश घासी वय वर्ष ४२, अजय उत्तम माचरेकर वय वर्ष ४५ ,राकेश बन्सी बंगाली वय वर्ष ४५, दिपक भिका इंदरेकर, वय वर्ष ३०,

मयुर दिनेश बजरंगे वय वर्ष ३३ व राजेश हरीयाभाई तमायचे वय वर्ष ४९, सर्व राहणार छारानगर अहमदाबाद, गुजरात अशी त्यांची नावे आहेत. पोलिस त्यांची आणखी कसून चौकशी करीत आहेत.