अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सणोत्सवावर अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे नागरिकांना देखील सणाचा खुलेपणाने आनंद घेता येत नव्हता,

मात्र यंदाच्या वर्षी काहीशी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांनी देखील मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला आहे.

यामुळे बाजरपेठा नागरिकांच्या गर्दीने तुडुंब भरल्या आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने शहराचा मध्यवर्ती व्यापारी भाग असलेल्या कापडबाजार, गंज बाजार, मोची गल्ली, चितळे रोड, माणिकचौक, सर्जेपुरा या ठिकाणी सकाळी ११ वाजेपासून ते रात्री १० पर्यंत अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होते.

दीपावली खरेदीच्या निमित्ताने होणारी वाहतूक कोंडी होणार नाही याचे नियोजन शहर वाहतूक शाखाने काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. परंतु त्यांचेकडून ढिसाळ नियोजन होत असल्याने खरेदीकरिता बाहेर पडलेले नागरिक त्रस्त झाले आहेत. तेलीखुंट ते कापडबाजार, भिंगारवाला चौक हा मार्ग एकेरी वाहतुकीचा आहे.

मात्र, अनेक उत्साही तरुण व बेजबाबदार नागरीक नियमांचा भंग करून नो एन्ट्रीमध्ये घुसतात. येथे वाहतूक पोलीस असतात मात्र अनेकदा तेही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसते.

पोलिसांना वाहतुकीचे नियमन, नियोजन, कायदा आणि त्याची अंमलबजावणी यांचे प्रशिक्षण दिले जाते. मनपा हद्दीत असलेल्या सिझलचा ही उपयोग होत नाही, पोलिस हजर असेल तरच नागरिक शिस्त पाळतात नसेल तर सिगल न पाहणारे अनेक महाभाग आहेत.