अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Krushi news :भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती व्यवसाय (Farming) करून आपला उदरनिर्वाह भागवत असते.

खरं पाहता भारतीय शेती (Indian Farming) अजूनही पावसाच्या पाण्यावर आधारीत आहे. सध्या देशातील शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी (Kharip Season) पूर्व मशागतीची (Pre Cultivation) तयारी करीत आहेत.

देशावर खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची शेती केली जाते. राज्यातही सोयाबीनचे क्षेत्र (Soybean Farming) विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यातील जवळपास सर्वच भागात सोयाबीनची शेती बघायला मिळते. सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे सोयाबीन पिकावर अवलंबून आहे.

सोयाबीनचे पीक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आहे याशिवाय ते मानवी आरोग्याला देखील फायदेशीर असल्याने याची मागणी बारा महिने बाजारात बघायला मिळते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सोयाबीनच्या उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. अर्थातच भारतात सोयाबीनची शेती विशेष उल्लेखनीय आहे.

यावर्षी सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव मिळाला असल्याने येत्या खरिपात सोयाबीन चा क्षेत्रात अजून वाढ होणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.

एका अहवालानुसार, सोयाबीनमध्ये सर्वाधिक प्रोटीन आढळते. हे एकमेव पीक आहे ज्यामध्ये प्रथिनांव्यतिरिक्त खनिजे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.

सोयाबीनमध्ये अनेक गुणधर्म असल्यामुळे त्याला पिवळे सोने म्हणुन शेतकरी संबोधत असतात. याच्या शेतीबद्दल बोलायचे झाले तर सोयाबीनच्या लागवडीत शेतकर्‍यांसाठी अपार वाव आहे.

याची शास्त्रीय पद्धतीने शेती करून शेतकरी अधिक नफा कमवू शकतात. यामुळे आज आपण सोयाबीनची शास्त्रीय शेती जाणून घेणार आहोत.

सोयाबीन शेतीविषयी सामान्य माहिती आम्ही आपणांस कळवू इच्छितो की, मध्य प्रदेश हे देशातील सर्वात मोठं सोयाबीन उत्पादक राज्य आहे. एवढंच नाही सोयाबीन संशोधन केंद्र मध्य प्रदेशातील इंदूर या शहरातचं आहे. याशिवाय भारतात, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश राज्यात देखील याची सर्वाधिक लागवड केली जाते.

सोयाबीन पिकासाठी आवश्यक हवामान मित्रांनो खरं पाहता, सोयाबीन हे उष्ण हवामानातील पीक आहे. त्यामुळे त्याच्या लागवडीसाठी सरासरी 18°C ​​ते 38°C तापमान सर्वोत्तम असल्याचे कृषी वैज्ञानिक सांगत असतात.

भारतात शेतकरी बांधव प्रामुख्याने खरीप हंगामात शेतकरी सोयाबीनची लागवड करण्यास सुरुवात करतात. मात्र असे असले तरी या उन्हाळी हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन लागवड केली गेली होती.

सोयाबीन लागवडीसाठी आवश्यक जमीन नेमकी कशी असावी बरं खरं पाहता, याच्या शेतीसाठी चिकणमाती आणि वालुयुक्त असलेली जमीन योग्य असल्याचे कृषी शास्त्रज्ञ सांगत असतात. मात्र ज्या शेतीजमिनीत पाणी साचत असते अशा शेतीजमिनीत सोयाबीनची शेती करू नये कारण जास्त पाणी या पिकाला मानवत नाही परिणामी पीक खराब होते.

याच्या शेतीमध्ये पूर्वमशागत देखील चांगली केली पाहिजे, यासाठी पेरणीपूर्वी शेतीजमिनीची खोल नांगरणी केली पाहिजे आणि जमिनीत सेंद्रिय खत किंवा जुने कुजलेले शेणखत 500 किलो प्रति हेक्‍टरी दिले पाहिजे जेणेकरून त्याच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळू शकते.

शेतीची तयारी (शेत तयार करणे) मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितले की, सोयाबीनची लागवड खरीप हंगामात केली जाते. यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची 2 ते 3 वेळा खोल नांगरणी करावी. त्यामुळे शेतातील हानिकारक कीटक नष्ट होतात. त्यानंतर जास्त उत्पादन घेण्यासाठी शेणखत नांगरणीच्या वेळी टाकावे.

बियाणे आणि पेरणीची वेळ सोयाबीनची लागवड जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. सोयाबीनसाठी प्रति हेक्टर 55-65 किलो बियाणे लागतं असते. चांगले उत्पादन घेण्यासाठी एका रोपापासून दुस-या रोपामध्ये 30-45 सेमी अंतर ठेवावे आणि बियांची खोली 2.5 ते 5 सेमी असावी.

बिजप्रक्रिया बीजप्रक्रिया करून किमान 15 ते 20 टक्के अधिक उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. यासाठी रायझोबियम (400 ग्रॅम प्रति 65-75 किलो बियाणे), फॉस्फरस विरघळणारे जिवाणू (PSB) आणि बुरशीनाशक (थिरम + कार्बेन्डाझिम) किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी @ 8-10 ग्रॅम/किलो बियाण्याची प्रक्रिया करावी.

सोयाबीन शेतीतुन कमाई सोयाबीन लागवड हे शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात चांगले उत्पादन देत असते. खरं पाहिल्यास त्याच्या लागवडीला हेक्टरी 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. काही गोष्टीची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना दर हेक्टरी खर्चाच्या दृष्टीने दुप्पट नफा मिळू शकतो.

पावसावर आधारित कोरडवाहू परिस्थितीत – 1600-2000 kg/हेक्टर आणि सिंचनाखाली – 2000-2500 kg/हेक्टर उत्पादन मिळू शकते. त्यामुळे सोयाबीनची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर शेती मानली जाते.