अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- एनपीएस, डीसीपीएस धारकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता रोखीने तातडीने अदा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची भेट घेऊन निवेदन दिले.

जिल्ह्यातील तीस ते चाळीस टक्के एनपीएस, डीसीपीएस धारक शिक्षक, शिक्षकेतरांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळालेला नाही. हा हप्ता दिवाळीपुर्वी रोखीने मिळण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला.

यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, मंगेश काळे, बद्रीनाथ शिंदे, देवीदास पालवे, भगवान राऊत, संदीप शिंदे, सुदाम दळवी, अमोल ठाणगे, विजय पठारे, पी.पी. लोंढे, रमाकांत दरेकर,

धनंजय गिरी, विठ्ठल काळे, स.रा. शिंदे, वैभव शिंदे, भरत शिंदे, अ.दा. काळे, जी.एस. बारामते आदी शिक्षक उपस्थित होते. जिल्ह्यातील तीस ते चाळीस टक्के एनपीएस, डीसीपीएस धारक शिक्षक, शिक्षकेतरांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळालेला नाही.

या संदर्भात शिक्षण विभागाला वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. काही शिक्षकांना याचा लाभ मिळाला असून, काही शिक्षक या लाभापासून वंचित असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगार मिळावा, एनपीएस, डीसीपीएस धारकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता रोखीने मिळावा,

पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यासाठी संबंधित विद्यालयातील शाळा प्रमुखास पत्र देऊन त्यांचे प्रस्ताव सादर करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली.