file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  एका विवाहितेचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपीने संबंधित महिलेकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करीत पाच लाखांची खंडणी मागितली.

हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी पीडितेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पीडितेच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध अपहरण, विनयभंग, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हाउसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी लोखंडे याने राहुरी परिसरात रात्रीच्या सुमारास घरी जात असलेल्या महिलेचे वाहन अडविले.

बंदुकीचा धाक दाखवून तिचे अपहरण केले, तसेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. ही बाब कोणास सांगितल्यास बदनामी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच आरोपीने पीडितेस पाच लाखांची खंडणीही मागितली व त्याने पीडितेकडून तीन लाख रुपये देखील घेतले. सुटका करून घेतल्यानंतर पीडित महिलेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.