Krushi news : खरीप हंगामातील खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेत अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे.

शेतक-यांनी आपल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ९८९०६०७४८९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व जिल्हा परिषदेतील ७५८८१७८८४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.