file photo

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी विरुद्ध एनसीपीत सुरु झालेली लढाई आता भाजपापर्यंत जाऊन पोहचली आहे. एका ड्रग्ज पेडलरसोबत पत्नीचे

नाव जोडल्यामुळे नाराज झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद गेत नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मलिक यांच्या कंपनीने ज्या लोकांकड़ून जमीन खरेदी केली आहे, ते १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

या जमिनी दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे, याबाबतची कागदपत्रेही त्यांनी सादर केली आहेत. काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

दिवाळीनंतर या प्रकरणात बॉम्ब फोडणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या आरोपांनंतर काही वेळातच नवाब मलिक यांचीही पत्रकार परिषद होणार आहे, त्यात मलिक या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता आहे.

राज्याचे अलंपसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील ड्रग्ज केसचे मास्टरमाईंड हे देवेंद्र फडणवीस आसल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

फडणवीस यांच्या सरकारमध्ये नीरज गुंडे नावाचा व्यक्ती सचिव वाझेप्रमाणे खंडणी उकळण्याचे काम करीत होता, असा दावाही मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता.

नीरज गुंडेला माजी मुख्यमंत्री फडणवीसांचे संरक्षण असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. नीरज गुंडेच्या घरी फडणवीस जात असत असेही मलिक म्हणाले होते.