पुणे : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल मुंबई मध्ये भाजपतर्फे आयोजित बुस्टर सभेत बोलताना बाबरी मशिदीवरून (Babri Masjid) भाष्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

तसेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद मधील सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या, राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामागे भाजपा आहे. मुख्यमंत्रीपदाची आस लावून बसलेले देवेंद्र फडणवीस हे सर्व करत आहेत असा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.

बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय होते? असा खोचक सवालही रुपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. काही प्रवृत्तींचा राज्यात दंगली घडवण्याचा कट आहे.

मात्र राज्यात दंगली होणार नाहीत. यासाठी महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. राज ठाकरेंच्या भाषणात अनेक मुद्दे आले,

ज्याची तपासणी पोलीस करत आहेत. त्याचबरोबर पोलीस मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवत आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे जर काही घटना घडलीच तर कारवाई होणार असेही पाटील म्हणाल्या.

राज ठाकरे यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेला ही रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कालच्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार हे जातीयवादी असल्याचे म्हंटले होते.

शरद पवार जातीयवादी नाहीत. राष्ट्रवादी पक्षात सर्व जातीचे आणि धर्माचे लोक आहेत असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.