अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे.(Bollywood News)

यातच नेतेमंडळींपाठोपाठ आता बॉलिवूडमधील कलाकारांना देखील कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना अलिकडच्या काळात करोनाची लागण झालेली दिसत आहे.

करिना कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या पाठोपाठ आता नोरा फतेहीची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.

या संदर्भात नोरानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. नोरा फतेहीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

तिने लिहिलं, ‘मी सध्या करोनाचा सामना करत आहे. खरं सांगू तर हे सर्व खूप कठीण आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क वापरा.

हा विषाणू खूप वेगाने पसरताना दिसत आहे. माझं दुर्दैव आहे की मला करोनाची लागण झाली आहे. या विषाणूची लागण कोणालाही होऊ शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. तुमच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. सुरक्षित राहा.’