Vintage Car : शेतकऱ्याने बनवली भन्नाट विंटेज कार 5 तास चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरचा प्रवास..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vintage Car : आज पर्यंत आपण अनेक नवीन शोधांबद्दल ऐकले असेल. अनेक लोक आपल्या क्रीयेटिव्हिटीचा उपयोग करून नवीन गोष्टी तयार करत असतात. मात्र पुण्यात चक्क एका शेतकऱ्याने अप्रतिम उपाय वापरून विंटेज कार बनवली आहे. अवघ्या काही तासातच चार्जे सुद्धा होते.

पुण्यातील रोहिदास नवघणे या शेतकऱ्याने एक अप्रतिम उपाय करून इलेक्ट्रिक कार बनवली आहे. दरम्यान, ही एक विंटेज कार असून, उत्तम रेंज देखील देते. दरम्यान, एव्हीध्य ३ महिन्यामध्ये ही कार बनवली गेली असून, या कारमध्ये दोन व्यक्ती आरामात प्रवास करू शकतात.

दरम्यान, या कारचे वशिष्टये म्हणजे 5-6 तास चार्ज केल्यानंतर ही कार एकाच वेळी 100 किलोमीटरचा प्रवास करू शकते. ही कार बनविण्यासाठी रोहिदास यांनी सर्व पार्ट स्वतः बनवले असून, त्यांनी संपूर्ण कार स्वतः बनवली आहे.

रोहिदास हे शेतीमधील अनेक अवजारे स्वतः बनवायचे. तसेच त्यांनी या कारसाठी फायबरचे मटेरियल वापरले आहे. दरम्यान, त्यांनी इलेक्ट्रिक वाहने पहिल्यांनंतर आपण स्वतःही अशी कार बनवू शकतो हे ठरवले. आणि मेक इन इंडिया या संकल्पनेपासून प्रेरित होऊन ही कार बनवली.