Discover

Best Mileage Bikes 2023 : सर्वात जास्त मायलेज देतात ‘या’ चार बाईक, किमतीही अगदी बजेटमध्ये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Best Mileage Bikes 2023 : आजकाल प्रत्येकजण कामासाठी बाईकने प्रवास करत असतो. जर रोज लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर त्यांसाठी जास्त मायलेज देणाऱ्या बाईक खूप चांगल्या असतात. यामुळे त्यांचा इंधन खर्च कमी होतो.

पैशांची देखील खूप बचत होते. बाजारात 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 100 ते 125 सीसीच्या अनेक बाईक उपलब्ध आहेत, ज्या केवळ चांगले मायलेजच देत नाहीत तर त्यांचा परफॉर्मन्सही चांगला आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊयात –

हीरो स्पलेंडर :
हिरो स्प्लेंडर ही देशातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आलेल्या या बाईकचा आजही सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्समध्ये समावेश आहे.

या बाईकमध्ये 97.2 सीसी एअर कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे 7.91 बीएचपी पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक सरासरी 80 किलोमीटर प्रति लिटर एवरेज देते.

बजाज प्लेटिना 100 :
बजाज प्लॅटिना बऱ्याच काळापासून बाजारात आहे. बजाजची ही सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. यात 102 सीसीचे इंजिन आहे जे 7.79 बीएचपीपॉवर जनरेट करते. तर याचा टॉर्क 8.30 एनएम आहे. बजाज प्लॅटिना 100 चे मायलेज सुमारे 70 ते 80 किलोमीटर प्रति लिटर आहे.

टीवीएस स्पोर्ट्स :
टीव्हीएस स्पोर्ट्स ही टीव्हीएसची सर्वात स्वस्त बाईक आहे. टीव्हीएस स्पोर्टमध्ये 109.7 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे सुमारे 8.29 बीएचपी ऊर्जा जनरेट करते. टीव्हीएस स्पोर्ट्स सुमारे 75 किमी प्रति लीटर मायलेज देते.

होंडा शाइन 125 :
होंडा शाईन 125 ही कम्यूटर सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट बाईकपैकी एक आहे. होंडामध्ये 123.9 सीसीइंजिन आहे जे 123.9 बीएचपी पॉवर आणि 11 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक सुमारे 65 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

अहमदनगर लाईव्ह 24