Vande Bharat Express : कमी खर्चिक आणि आरामदायी प्रवासासह ही आहे वंदे सधारणची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर..

Pragati
Published:

Vande Bharat Express : वंदे भारताच्या लोकप्रियतेनंतर आता लवकरच वंदे साधारण एक्सप्रेस सुरु करण्याची तयारी केली जात आहे. कमी तिकीट दर आणि आरामदायी प्रवासासोबत जाणून घ्या वंदे साधारण एक्सप्रेसची ही खास वैशिष्ट्य.

टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये वंदे साधारणची चाचणी घेतली जाणार असून, ही २२ कोच ३ टीअर स्लीपर ट्रेन असणार असणार आहे. दरम्यान याचा प्रवास ही स्वस्त असणार असल्यामुळे प्रवास करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

दरम्यान, ही ट्रेन १३० प्रति किलोमीटर धावणार असून, या ट्रेनमध्ये एकूण १८०० प्रवासी प्रवास करू शकतात. रिपोर्ट नुसार मुंबई ते नाशिक कॉरीडॉर मध्ये या ट्रेनची चाचणी घेतली जाणार असून, या ट्रेन चा रूट हा मुंबई ते दिल्ली दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वंदे भारत साठी पुढील योजना

भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर कोच आणि वंदे भारत मेट्रो लाँच करण्याची योजना केली जात आहे. अशी घोषणा रेल्वे बोर्ड सचिव मिलिंद देऊस्कर यांनी केली आहे. दरम्यान, याआधी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी कन्सेप्ट ट्रेन वंदे भारत (स्लीपर) याचे फोटो सो शल मीडियावरती शेअर केले होते.

दरम्यान, प्रत्येक वंदे भारत स्लीपर ट्रेन हे १६० किलोमीटर धावेल अशी डिसाईन केली जाणार असून, याला १६ कोच असणार आहेत. तर या ट्रेन मध्ये एकूण ८८७ प्रवाशी प्रवास करू शकतात. दरम्यान, १०२ वंदे भारत ट्रेनच्या प्रोडक्शनची रूपरेषा आखली गेली आहे.

ज्यामध्ये २०२२-२०२३ मध्ये ३५ तर २०२३- २०२४ मध्ये ६७ रॅकची निर्मिती करणार आहे. दरम्यान, हे रॅक इंटिग्रल कोच फॅक्टरी, रेल कोच फॅक्टरी आणि मॉडर्न कोच फॅक्टरी मध्ये तयार केले जाणार आहेत. यातील ७५ रॅक चेअर कार व्हर्जन मध्ये असतील तर उर्वरित स्लीपर व्हर्जन मध्ये असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe