Discover

Maharashtra 5 Places to Visit in Monsoon : लोणावळा, महाबळेश्वर सोडा यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील ह्या पाच ठिकाणी नक्की फिरायला जा ! डोंगर, झाडी,समुद्रकिनारे आणि धबधबे…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Maharashtra 5 Places to Visit in Monsoon :- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसांमध्ये जर तुमचा कुठे निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक निसर्गसौंदर्यांनी नटलेली ठिकाणे आहेत.

यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात फिरताना अनेक ठिकाणी धबधबे, निसर्गाने पसरवलेला हिरवा गार गालिचा, डोंगराळ भागात वाहणाऱ्या नद्या तसेच धबधबे व धरणे इत्यादींचे मनमोहक रूप पाहण्यासाठी अनेक पर्यटक आसुसलेले असतात.

पावसाच्या दिवसांमध्ये रिमझिम पावसात भिजत मस्तपैकी चहाचा झुरका मारत निसर्गाचे रूप पाहणे यामध्ये असणारी मजा काही औरच असते. याच दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण महाराष्ट्रातील काही महत्वाची ठिकाणांची माहिती घेणार आहोत. जे पर्यटनासाठी खूप उत्तम आहेत.

महाराष्ट्रातील काही पिकनिक स्पॉट

1- गोराई- गोराई हे ठिकाण समुद्रकिनाऱ्या करिता खूप प्रसिद्ध असून मुंबईवरून जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बोरिवली व भाईंदर वरून सहजपणे या ठिकाणी जाऊ शकतात.

बोरिवली स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्ही बस किंवा रिक्षाच्या साह्याने गोराईला पोहोचू शकतात. त्या ठिकाणहून तुम्हाला लॉन्चने गोराई किनाऱ्यावर जाता येते.

2- कर्जत- एक दिवसाची पिकनिक जर तुम्हाला आयोजित करायचे असेल तर कर्जत हे ठिकाण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अनेक मनमोहक आणि विलोभनीय असे धबधबे असतात. एवढेच नाही या ठिकाणी धरणाच्या सांडव्यातून जे काही पाणी होते ते देखील एक आकर्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे.

तसेच उत्तम प्रकारचे रिसॉर्ट देखील या ठिकाणी असून एक दिवसाच्या पिकनिक साठी हे ठिकाण खूप महत्वपूर्ण आहे.

3- चिंचोटी- पावसाळ्यामध्ये धबधबे अनेक ठिकाणी बघायला मिळतात. या धबधब्याखाली उभे राहून चिंब भिजण्यात खूप मजा असते. या अनुषंगाने चिंचोटी हे ठिकाण खूप महत्वपूर्ण असून पावसाळ्यामध्ये मुंबई ते अहमदाबाद मार्गावर असलेल्या चिंचोटी या ठिकाणी खळाळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जाता येऊ शकते.

या ठिकाणी जर तुम्हाला धबधब्यापर्यंत जायचे असेल तर हिरव्यागार अश्या झाडांमधून तुम्हाला मार्गक्रमण करावे लागते.

4- अलिबाग – हे ठिकाण देखील खूप महत्वपूर्ण असून या ठिकाणी देखील उत्तम व विलोभनीय असे अनेक समुद्रकिनारे आहेत.

त्यामुळे अलिबाग पर्यटकांचा एक महत्त्वाचा पिकनिक स्पॉट असून एक दिवसाच्या पिकनिक साठी हा एक चांगला पर्याय आहे.

5- येऊर – हे देखील एक महत्वपूर्ण आणि प्रेक्षणीय असे ठिकाण असून ते ठाणे जिल्ह्यात आहे. तुम्हाला जंगलात फिरायची आवड असेल व पक्षी निरीक्षण करण्याचा छंद असेल तर येऊर हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे.

या ठिकाणी अनेक छोट्या छोट्या टेकड्या आणि जंगलं असल्यामुळे येथे भटकंती करताना पावसाळ्यात खूप वेगळा आनंद मिळतो.

अहमदनगर लाईव्ह 24