Namo Shetkari Mahasanman Yojana :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेप्रमाणे, नमो शेतकरी योजना शासनाने सुरू केली आहे. काही दिवसापूर्वीच मंत्रिमंडळामध्ये नमो शेतकरी योजना अधिकारीकरीत्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नमो शेतकरी योजना नक्की काय आहे? योजनेसंबंधीचे महत्त्वाचे पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे आज आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.
प्रश्न 1 – ‘नमो शेतकरी योजना’ काय आहे?
केंद्र शासनाने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजना आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 24 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे घोषित करण्यात आली आहे. सोबतच सध्या मागील मंत्रिमंडळ अधिवेशनामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या योजनेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी प्रत्येकी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. Pm किसान योजने प्रमाणेच नमो शेतकरी योजना चा हप्ता असणार आहे.
याचा अर्थ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेद्वारे वर्षाला ₹12,000 हजार रुपये मिळणार आहेत.
प्रश्न 2 – नमो शेतकरी योजनेचा लाभ कुणाला मिळणार?
नमो शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे, त्यामुळे या योजनेचा सर्वस्वी लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी राज्यातील जे शेतकरी पात्र आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
प्रश्न 3- योजना कधीपासून व कशी लागू होणार?
नमो शेतकरी योजनेचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर दिला जाणार आहे. पी एम किसान चा 14 वा हा लवकरच जाहीर करण्यात येणार असून, पीएम किसान च्या चौदाव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि जेव्हा pm किसान चा चौदावा हप्ता जाहीर होईल तेव्हापासूनच नमो शेतकरी योजना देखील सुरू होणार आहे.
प्रश्न 4 -किती शेतकऱ्यांना लाभ होणार?
नमो शेतकरी योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकणार नाही, कारण पी एम किसान योजनेमध्ये राज्यातील जितके शेतकरी पात्र आहेत फक्त त्यांना नमो योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. परंतु जेव्हा नवा शेतकरी योजना प्रत्यक्षात लागू होईल, तेव्हाच या योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळेल हे पाहता येणार आहे.
प्रश्न 5 – पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?
पी एम किसान योजनेचा ₹2000 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी, आता शासनाने नवीन धोरण आखले आहे. त्यानुसार लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य केले आहे.
राज्यात अजूनही 12 लाख हून अधिक शेतकरी असे आहेत, ज्यांनी अजून त्यांच्या बँक खात्याला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर लिंक केला नाही. त्यामुळेच आता या योजनेचे पैसे अशा शेतकऱ्यांना मिळणार नाहीत, pm kisan योजने बरोबरच नमो शेतकरी योजनेमधून देखील अशा शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे.
तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी काही नमो शेतकरी योजने संबंधीचे प्रश्न. मला आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल, अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.