अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2: द रूल ने प्रेक्षकांमध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण केले आहे. डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाची नवी उंची गाठत आहे. आतापर्यंत पुष्पा 2 ने 1,800 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले आहेत.चित्रपटगृहांमध्ये आजही तो हाऊसफुल्ल होत आहे.
पुष्पा 2 OTT वर कधी येणार?
पुष्पा 2 च्या ओटीटी रिलीजची आतुरता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. नेटफ्लिक्स या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने याचा हक्क मिळवला आहे. थिएटर रिलीजनंतर 56 दिवसांनी हा चित्रपट ओटीटीवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुष्पा 2 हा जानेवारी 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी 2025 च्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
अल्लू अर्जुन देणार २० मिनिट जास्त
विशेष म्हणजे नेटफ्लिक्सवर पुष्पा 2 चा एक विशेष विस्तारित कट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या कटमध्ये मूळ थिएटर व्हर्जनच्या तुलनेत 20 मिनिटे जास्त पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये अनुभवलेल्या कथेबाहेर काही वेगळे आणि अधिक रोमांचक दृश्यांचा आनंद घेता येईल.
चित्रपटाची लोकप्रियता आणि चाहत्यांची उत्सुकता
अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पा राजचा दमदार आणि प्रभावी अभिनय, फहद फासिलने साकारलेला खलनायक भंवर सिंग, आणि रश्मिका मंदानाचा मोहक अभिनय यामुळे चित्रपटाने 2024 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून नावलौकिक मिळवला आहे. पुष्पा 2 च्या आयकॉनिक संवादांनी आणि अल्लू अर्जुनच्या स्टाइलने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
थिएटरमधून OTT पर्यंतचा प्रवास
पुष्पा 2 पुन्हा एकदा 11 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला, ज्यामुळे त्याच्या यशात आणखी भर पडली. हा चित्रपट एक संपूर्ण मनोरंजनाचा खजिना असून, त्याच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षक आतुर आहेत. यामुळे प्रेक्षकांना आता थिएटरमध्ये न पाहिलेला आणि OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या विस्तारित कटमधून चित्रपटाची एक नवीन अनुभूती मिळणार आहे.