Rule Changes : प्रत्येक महिन्याच्या सुरवातीस काही न काही नवे आर्थिक बदल होत असतात. हे बदल सर्व सामान्यांसाठी महत्वपूर्ण ठरतात. त्याचप्रमाणे १ नोव्हेंबरपासून काही नवे नियम सुरु होणार असून काही जुन्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. ज्याचा परिणाम थेट सर्व सामान्यांच्या खिशावर होणार आहेत. जाणून घ्या या नवीन आर्थिक बदला बाबत.
गॅसच्या दरात वाढ
सध्याच्या घडीला गॅसचे दर हे बदलले गेले असून, तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) बुधवारी देशभरातील किमतींच्या मासिक सुधारणांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 101.5 रुपयांनी वाढ केली. हे दर 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू होणार असून, दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 1731.5 रुपयांवरून 1,833 रुपयांपर्यंत वाढणार आहे. दरम्यान, व्यावसायिक गॅसच्या दारात होणारी वाढ हा एक मोठा बदल ठरणार असून, याचा फटका व्यावसायिकांना बसणार आहे.
हे ई-चलन करा अपलोड
GST चलन हे आता अपलोड करणे आवश्यक असून, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) नुसार, किमान ₹100 कोटींची उलाढाल असलेल्या व्यक्तीला पुढील 30 दिवसांच्या आत ई-चलान पोर्टलवर त्याचे GST चलन अपलोड करावे लागेल. यामुळे 100 कोटींची उलाढाल करणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.
लॅपटॉप आयात
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात ही मोठ्या प्रमाणात होत असून, यामध्ये लॅपटॉप च्या आयातीमध्ये काही बदल करण्यात येत आहेत. 3 ऑगस्ट रोजी सरकारने HSN 8741 श्रेणीतील लॅपटॉप, वैयक्तिक संगणक (पीसी) आणि टॅब्लेटसह सात वस्तूंच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली होती. मात्र, 31 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच कालपर्यंत निर्बंध पुढे ढकलण्यात आले. मात्र या धोरणात कोणताही बदल जाहीर न केल्यास, या सात वस्तूंच्या मंजुरीसाठी आता वैध ‘प्रतिबंधित आयात परवाना’ आवश्यक असेल.