Discover

पुणे नाशिक भुसावळ एक्‍स्प्रेस सुरू करा ! प्रवाशांच्या खिशाला होतोय मोठा त्रास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे- नाशिक – भुसावळ एक्स्प्रेस गेल्या नऊ महिन्यांपासून बंद आहे. भुसावळ विभागात तिसऱ्या मार्गिकेची तसेच इतर तांत्रिक कामे सुरू असल्याने ३९ ऑक्टोबरपर्यंत ही ट्रेन रद्द राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

पुणे-नाशिकदरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर कराबा लागत आहे. ही रेल्वे पुन्हा लबकर सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पुणे-नाशिकदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. शैक्षणिक, व्यावसायिक कारणासाठी या दोन शहरांदरम्यान प्रवास करणारे अनेक जण आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे-नाशिक-भुसावळ एक्स्प्रेस बंद आहे.

पुणे, पनवेल, इगतपुरी, कसारा घाटमार्गे नाशिक, भुसावळ या दरम्यान ही एक्स्प्रेस सुरू होती. या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेचा फायदा व्हायचा.

मात्र, रेल्वे प्रशासनाने जानेवारी २०२३ पासून ही रेल्वे बंद केली आहे. या प्रवाशांना नाइलाजाने एसटी अथवा खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागतो. दरम्यान, कर्जत स्थानकाच्या रिमॉडेलिंगच्या कामामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही रेल्वे तीन महिने बंद राहील, असे कारण सुरुवातीला देण्यात आले होते.

त्यानंतर घाट विभागात काम सुरू केल्यामुळे ही रेल्वे ३९ मार्चपासून पुन्हा अनिश्‍चित काळासाठी बंद केली गेली. सध्या इगतपुरी ते भुसावळदरम्यान डेमू चालवली जाते; परंतु या गाडीचा पुण्यातून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना काहीही फायदा होत नाही. त्यामुळे पुणे ते नाशिकदरम्यानची ही रेल्वे सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

भुसावळ विभागात विविध तांत्रिक कामे सुरू आहेत. तिसऱ्या मार्गिकेचे कामही सुरू आहे . सध्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ही ट्रेन रद्द ठेवण्यात आली आहे. पुढील नियोजन अद्याप ठरले नाही – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24