Thailand Tour : पर्यटन प्रेमींसाठी पर्वणी, आता ‘या’ देशात करा विना व्हिसा प्रवास, जाणून घ्या..

Pragati
Published:

Thailand Tour : पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून, जर तुम्ही थायलंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. येत्या काही दिवसांसाठी भारतीयांना थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. याचा फायदा अनेक पर्यटन प्रेमींना होणार असून, जाणून घ्या याबद्दल.

थाई सरकारने नवीन धोरण आखले असून, थाई टुरिझमनुसार, तुम्ही 10 नोव्हेंबर 2023 ते 10 मे 2024 या कालावधीत व्हिसाशिवाय थायलंडला जाऊ शकता. या कालावधीत पर्यटक तेथे 30 दिवस राहू शकतात. थाई टुरिझमने भारत आणि तैवानमधील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, यापूर्वी सप्टेंबर महिन्यात थायलंडनेही चीनी पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती.

श्रीलंकेनेही सूट दिली होती.

दरम्यान, यापूर्वी श्रीलंकेने सुद्धा 31 मार्च 2024 पर्यंत भारतीय पर्यटकांना व्हिसा मोफत प्रवेश देण्याची घोषणा केली होती. थायलंडपूर्वी श्रीलंकेनेही भारतीय पर्यटकांना आनंदाची बातमी दिली होती. मात्र, श्रीलंकेने भारत, चीन आणि रशियासह 7 देशांतील पर्यटकांना व्हिसा फ्री एन्ट्री जाहीर केली होती. कोरोनाच्या कालावधीनंतर अनेक देश भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने सुविधा देत आहेत. यामुळे याचा फायदा हा पर्यटक प्रेमींना निश्तितच होणार आहे.

भारतीय मोठ्या संख्येने थायलंडला जातात

दरम्यान, भारतातून थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठी आहे. भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने थायलंडला भेट देतात. या वर्षी आतापर्यंत मलेशिया, चीन आणि दक्षिण कोरियानंतर सर्वाधिक पर्यटक भारतातून आले आहेत. या वर्षी आतापर्यंत 12 लाख पर्यटक भारतातून थायलंडला गेले आहेत. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. 2011 मध्ये 1.4 कोटी भारतीयांनी परदेशात प्रवास केला होता, जो 2019 मध्ये वाढून 2.7 कोटी झाला. जे 2019 मध्ये 2.7 कोटी झाले. यानंतर कोरोनाचा काळ आला. असे असूनही 2022 मध्ये 2.1 कोटी भारतीयांनी परदेशात प्रवास केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe