Two-Wheeler Festive Offers : नवरात्र आणि दसऱ्यादरम्यान वाहने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी होत असते. याचाच फायदा घेण्यासाठी अनेक इलेक्ट्रिक बाईक निर्मात्यांनी अतिशय आकर्षक डिस्काउंट ऑफर्स आणल्या आहेत. त्याच्या मदतीने फेस्टिव्ह सीजनमध्ये वाहन खरेदीवर प्रचंड सूट मिळू शकते.
ओला इलेक्ट्रिक
ओला इलेक्ट्रिक ही त्याची नवीन ईव्ही स्कूटर खरेदी करताना आपल्या ग्राहकांना सर्व मॉडेल्सवर 24,300 रुपयांची सूट देत आहे. सध्या ओला इलेक्ट्रिकच्या पोर्टफोलिओमध्ये S1X, S1Air आणि S1Pro स्कूटरचा समावेश आहे. नवीन ओला एस 1 प्रो खरेदी केल्यास कंपनी 7000 रुपयांची पाच वर्षांची बॅटरी वॉरंटी देत आहे. तर ओला एस 1 एअरच्या एक्सटेंडेड वॉरंटीवर 50 टक्के सूट मिळते.
जर एखाद्या ग्राहकाने आपले जुने पेट्रोल वाहन ओला इलेक्ट्रिक सोबत एक्सचेंज केले तर त्याला 10,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. कंपनीने फ्लेक्सीबल ईएमआय ऑफरसाठी अनेक क्रेडिट कार्ड कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
याशिवाय, कंपनी शून्य डाऊन पेमेंटवरही वाहन ऑफर करत आहे. कंपनीने रेफरल कॅशबॅक देखील लॉन्च केला आहे, ज्यामध्ये रेफरीला रु. 1,000 कॅशबॅक मिळेल आणि रेफररला मोफत Ola Care+ सोबत रु. 2,000 कॅशबॅक मिळेल.
एथर एनर्जी
इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जीने आपल्या ईव्ही मॉडेल 450 एस, 450 एक्स 2.9 केडब्ल्यूएच आणि 450 एक्स 3.7 केडब्ल्यूएच वर फेस्टिव्ह ऑफर्स सादर केल्या आहेत. कंपनी आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर 450 एस वर 5,000 रुपयांचे फ्लॅट फेस्टिव्हल बेनिफिट्स देत आहे.
याशिवाय ग्राहकांना 1,500 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर आणि जुन्या स्कूटरच्या बदल्यात अर्थात एक्स्चेंज ऑफरमध्ये 40,000 रुपयांपर्यंत बोनस देखील दिला जात आहे. हे सर्व बेनिफिट घेतले तर एथर 450S ही 86,050 रुपयांना मिळेल.
मिड-रेंज 450X 2.9 kWh 1,500 रुपयांच्या कॉर्पोरेट डीलसह आणि 40,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. सर्व बेनिफिट एकत्रित केल्यास 450X ची किंमत रु. 101,050 रुपये होईल. सर्वाधिक किमतीची 450X 3.7 kWh देखील 450X 2.9 kWh सारखीच डील ऑफर करते आणि त्याची किंमत 110,249 रुपयांपर्यंत जाते.