Ahmednagar Politics :- महाराष्ट्रात अजित पवार गट सत्तेत येऊन काही महिने लोटली. नुकतंच अजित पवार यांनी काही पालकमंत्रीपदे पदरात पाडून घेतली. आता नवरात्र उत्सव झाला की हिवाळी अधिवेशनाचे वेध लागतील. त्यामुळे साहजिकच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न होईल.
यामध्ये अजित पवार गटाला काही मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे. तस झालं तर अहमदनगर जिल्ह्यात एखाद मंत्रिपद येऊ शकत. पण यासाठी वर्णी कुणाची लागणार? कारण सध्या आ. संग्राम जगताप व आ.निलेश लंके हे दोन्ही पॉवरफुल आहेत. व दोघांनीही मंत्रिपदासाठी ताकद लावली आहे.
आ.निलेश लंके यांचा नवरात्रीत ‘करेक्ट’ कार्यक्रम
राष्ट्रवादीची माणसं करेक्ट कार्यक्रम करायला एक नंबरअसतात असं राजकारणात चर्चिल जात. आता आगामी मंत्रिपदासाठी निलेश लंके फिल्डिंग लावून आहेत. त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारनेर मतदारसंघात लंके यांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन अजित दादांच्या उपस्थितीत ठरवले आहेत.
विशेष म्हणजे यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे देखिल उपस्थित असणार आहेत. 16 ऑक्टोबरला पारनेरमध्ये ते येणार आहेत. नवरात्री उत्सवात लंके हे महिलांसाठी मोहटा देवी यात्रेचे आयोजन करतात.
मोठी सहानुभूती व मोठा प्रतिसाद महिलांचा याला मिळतो. मोठी गर्दी असते. आणि याच कार्यक्रमाची संधी साधत आ. लंके यांनी अजित पवारांना बोलावून करेक्ट कार्यक्रम केला आहे. याचा त्यांना मंत्रिपदासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.
आ. जगतापांच बदलतं राजकारण व धनंजय मुंडेंशी असलेली मैत्री
संग्राम जगताप हे अजित पवार यांनाच सर्वस्व मानतात. कारण ज्याठिकांणी अजित पवार त्याठिकाणी संग्राम जगताप हे समीकरण ठरलेलं. आता संग्राम यांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.जगताप परिवाराचे पवार घराण्यासोबत पूर्वापार चांगले संबंध आहेत. संग्राम जगताप आता दुसऱ्यांदा आमदार आहेत. विशेष म्हणजे अजित दादांसोबत सर्वात आधी जाणारे ते आमदार आहेत.
सध्या विखेंशी जवळीक साधत त्यांनी राजकारणातही बदल केला आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. नुकतेच एका कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे याना संग्राम जगताप यांनी बोलवलं होत आणि ते आलेही होते.
त्यामुळे मुंडे यांच्याशी असणारी मैत्री व बदलत राजकारण चमत्कार करेल आणि जगताप यांना मंत्रिपदाची संधी मिळेल का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
विखे विरुद्ध लंके आक्रमकता व जगताप व विखे यांची सलगी
अहमदनगरच्या राजकारणात विखे यांचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. परंतु विखे व पवार घराण्याचे राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. परंतु आ. जगताप व विखे यांचे चांगलेच राजकीय सूर जुळले आहेत.
अनेक ठिकाणी हे दोघेही एकत्र असतात. याउलट आ. नीलेश लंके आणि विखे यांचे मात्र राजकीय वैरच आहे. त्यांचे अद्यापही काही पटलेले नाही. त्यामुळे आता या गोष्टीचा पवार नेमका कसा अर्थ घेणार हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आता मंत्रिपद नेमके कुणाच्या गळ्यात जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.