अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच आज शनिवारी राहुरी कारावासातील पाच कैदी जेलमधून फरार झाले आहे.

त्यामुळे राहुरी पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. तसेच हे गुन्हेगार बाहेर गुन्हेगारी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, या फरार कैद्यांमधील दोघांना स्टेशन रोड परिसरात पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.

उर्वरित तीन पसार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहेत. यापूर्वीही अनेक कैदी राहुरी कारावासातून पसार झाले आहेत.

मात्र, त्यांचा शोध लागलेला नसतानाच आता पुन्हा ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर संशय व्यक्त केला जातो आहे.

राहुरी तालुक्यात कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.