जिल्‍हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  जिल्‍हा वार्षिक योजना २०२१- २२अंतर्गत जिल्‍ह्यासाठी ५१० कोटी रुपये नियतव्‍यय मंजुर आहे.जिल्‍यातील सर्व यंत्रणांनी आपआपल्‍या विभागांना मंजुर झालेला निधी वेळेत खर्च करावा.

अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्‍या. जिल्‍हा वार्षिक योजना आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले म्‍हणाले ज्‍या विभागांनी निधीची मागणी केली आहे त्‍यांनी आपल्‍या प्रस्‍तावित कामांबाबत निधीच्‍या खर्चाचे नियोजन करुन आपआपल्‍या मुख्‍यालयाकडुन तांत्रिक मान्‍यता घेऊन आपले प्रस्‍ताव प्रशासकीय मान्‍यतेसाठी तात्‍काळ सादर करावेत.

जिल्‍हा परिषदेने आपल्‍या विविध विभागांसाठी लागणा-या निधीची मागणी व नवीन कामांचे प्रस्‍ताव जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावेत.

आगामी काळात जिल्‍ह्यात होऊ घातलेल्‍या निवडणूक आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेऊन ३१ मार्च २२ पर्यंत १०० टक्‍के निधी खर्च झाला पाहिजे असे नियोजन करावे.

तसेच पुढील वर्षासाठी प्रारुप आराखडा तात्‍काळ सादर करावा. असेही त्‍यांनी यावेळी सांगितले. या बैठकीमध्‍ये जिल्‍ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आजपर्यंत झालेल्‍या खर्चाबाबत व नियोजनाबाबत आपल्‍या विभागाचा आढावा सादर केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!