Diwali 2022 : भारतात (India) यावर्षी 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरा केली जाणार आहे. यावर्षी या दिवाळीवर (Deepavali 2022) सूर्यग्रहणाची (Solar eclipse) छाया असणार आहे.

सूर्यग्रहण हे नेहमीच अमावस्या तिथीला असते आणि दिवाळीही अमावस्येला आहे. यावर्षी दिवाळीच्या (Diwali in 2022) रात्रीपासूनच सूर्यग्रहण सुरु होणार आहे.

यावर्षी कार्तिक अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 5:29:35 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 4:20:38 पर्यंत सुरू राहील.त्यामुळे 24 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे.

त्याचवेळी दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होणार आहे.त्यामुळे दिवाळीच्या (Diwali 2022 date) पूजेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.25 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार 4:29 वाजता ग्रहण सुरू होईल आणि 5:24 पर्यंत सूर्यग्रहण राहील.मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.त्यामुळे सुतक कालावधी वैध राहणार नाही.

धनत्रयोदशी, महालक्ष्मी पूजा, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेच्या नेमकी तारीख जाणून घेऊया.

धनत्रयोदशी कधी असते?

धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi) सण दिवाळीपूर्वी (Diwali) साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यावर्षी धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी येत आहे.

महालक्ष्मी पूजन कधी?

यंदा महालक्ष्मी पूजन सोमवार, 24 ऑक्टोबर रोजी आहे. कार्तिक महिन्यातील अमावास्येला महालक्ष्मी पूजन केले जाते. या पवित्र दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते.

गोवर्धन पूजा कधी?

यावर्षी बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा आहे. देशाच्या काही भागात याला अन्नकूट म्हणूनही ओळखले जाते. गोवर्धन पूजेच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, गोवर्धन पर्वत आणि गायींची पूजा केली जाते. गोवर्धन पूजेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला 56 किंवा 108 प्रकारचे पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते.

भाऊबीज कधी आहे?

यावर्षी 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. भाऊबीज हा दिवाळी सणाचा शेवटचा सण आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या अपार प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. याला यम द्वितीया किंवा भत्री द्वितीया असेही म्हणतात.