अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-   पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ७२ व्‍या गळीत हंगामाचा बॉयलर अंग्निप्रदिपन समारंभ भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील आणि जिल्‍हा बॅकेचे संचालक आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला.

प्रवरा बॅकेचे चेअरमन अशोकराव म्‍हस्‍के, कारखान्‍याचे संचालक डॉ.दिनकर गायकवाड, साहेबराव म्‍हस्‍के, संतोष ब्राम्‍हणे, पोपटराव वाणी यांच्‍या हस्‍ते सपत्‍नीक बॉयलरची विधीवत पुजा करण्‍यात आली.

याप्रसंगी कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडु, ट्रक्‍स वाहतुक सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, पंचायत समितीच्‍या सभातपी सौ.नंदाताई तांबे, प्रवरा फळे भाजीपाला संस्‍थेच्‍या चेअरमन सौ.गिताताई थेटे, जिल्‍हा परिषद सदस्‍य दिनेश बर्डे,

सौ.रोहीणी निघुते, प्रभारी कार्यकारी संचालक सौ.सी.आर गायके यांच्‍यासह सर्व संचालक आणि विविध विभागांचे आधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी चेअरमन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी या सोहळ्याच्‍या निमित्‍ताने यंदाचा गळीत हंगाम यशस्‍वीपणे पुर्ण करण्‍यासाठी सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. उपस्थितांचे आभार व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडू यांनी मानले.