Health Tips In Marathi :- तांब्याची भांडी सर्वसाधारणपणे पूजा, पाठ इत्यादीं सारख्या शुभकार्यात वापरली जातात. काही वेळ तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी, ज्याला कॉपर चार्ज्ड वॉटर म्हणतात, पिण्याचे प्रमाण वाढले आहे.

चांगल्या आरोग्यासाठी ते आवश्यक मानले जाते. पण तरीही काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे . . . अनेक शतकांपासून तांब्याच्या भांड्यांचा स्वयंपाक करण्यासाठी उपयोग केला जात आहे.

तांब्याची भांडी प्रतिकारशक्‍ती वाढविणे, सांधे मजबूत होणे, थायरॉइड संतुलित होणे, पचनसंस्था चांगली राहणे आणि शरीराला लोह मिळण्यासाठी उत्कृष्ट आहेत.

पाण्याचे शुद्धीकरण आणि बॅक्टेरिया विरोधी क्षमतांसाठी तांबे आणि तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी चांगले मानण्यात येते.

आयुर्वेदानुसार ताप्रजल शरीरातील तीन दोष वात, पित्त, आणि कफ यांच्यामुळे होणाऱ्या त्रासांना दूर करते. तांबे एक खनिज आहे, जे शरीरातील अनेक कार्यांसाठी आवश्यक आहे.

हे अंटी मायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-कार्सिनोजेन आणि अँटी-ऑक्सीडंट घटकांनी भरपूर आहे. तांबे हे हिमोग्लोबिनची निर्मिती करणे, पेशींना विकसित करणे यासाठी मदत करणारे आहे.

ताप्रजल म्हणजे तांब्याचे पाणी पिल्याने शरीरात या धातूची आवश्यकता पूर्ण केली जाऊ शकते. तथापि, याचे खूप कमी प्रमाण आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.

जागतिक आरोग्य संघटनेने प्रौढ पुरुष आणि स्त्रियांसाठी दररोज 0.९ मिलीग्रॅम तांबे पुरेसे असल्याचे सांगितले आहे.

काय आहे कॉपर चार्ज्ड वॉटर : – तांब्याचे भांडे किंवा बाटलीत पाणी भरून ते आठ तासांसाठी ठेवा. सकाळी हे पाणी प्या. या प्रक्रियेला ओलिगो डायनॅमिक इफेक्ट म्हणतात.

त्यात तांब्याचे गुण पाण्यात मिसळतात. हेच पाणी ताग्रजल किंवा तांब्याचे पाणी किंवा कॉपर चार्ज्ड वॉटर म्हणून ओळखले जाते.

हे तांबे पाण्यात असलेल्या अनेक प्रकारच्या बेक्टेरियाचा खात्मा करून पाण्याचे शुद्धीकरण करते. पाण्याला बारा तासापेक्षा जास्त वेळ ठेवू नका.

किती पाणी प्यावे ? : – आयुर्वेदानुसार ताम्रजल सकाळी रिकाम्या पोटी प्यायला हवे. एका दिवशी दोन ग्लास ताग्रजल पिणे पुरेसे आहे. हे पाणी पिण्याची अट अशी आहे की, पोट रिकामे असायला हवे.

सातत्याने पंधरा दिवस नियमितपणे तांब्याच्या भांड्याचे पाणी पिल्यानंतर दोन-तीन दिवस त्यामध्ये ब्रेक घ्या. त्यादरम्यान शरीरात जास्त झालेले तांबे आणि इतर टॉक्सिन बाहेर पडतील.

ही सावधगिरी आवश्यक : –

तांब्याची बाटली किंवा भांडे खरेदी करताना हे लक्षात ठेवा की, ते सर्टिफिकेटसह घेतले जावे. ते पूर्णपणे तांब्याचा असायला हवे. कोणत्याही दुसर्‍या धातूच्या मिश्रणाने तयार केलेले नसावे.

नवीन भांड्याला लिंबाच्या पाण्याने धुवा, नंतरच त्याचा वापर करा.बाटली किंवा भांडे पाण्याने भरण्याच्या आधी त्याला रोज चांगल्या प्रकारे साफ करा.

जुने पाणी टाकून दिल्यानंतरच नवीन पाणी भरा.तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी किंवा बाटली कधीही रेफ्रिजरेटर मध्ये ठेवू नका.

तांब्याच्या भांड्यांमधील पाणी दुसर्‍या कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नका. त्याला तांब्याच्या भांड्यातून किंवा बाटलीतून ही प्या. काचेच्या ग्लासात ही पिऊ शकता.

जर गरम किंवा कोमट पाणी पिण्याची सवय असेल तर तांब्याच्या भांड्याला गॅसवर ठेवा. कोणत्याही इतर धातूच्या भांड्यात पाणी रिकामे करून गरम करू नका.